Tuesday, December 23, 2025

local love story : लोकलमधलं प्रेम



सकाळची धावपळ सुरू होती. लोकल पकडण्यासाठी माणसं धावत होती. सकाळी 8.27ची विरार-चर्चगेट लोकल लागली होती. जागा मिळवण्यासाठी प्रवासी गर्दीत चिरत होते. लोकलने हॉर्न दिला...लोकल खचाखच भरली होती. चला, घुसा, धक्का मार, बाजूला हो...प्रवाशांचे आवाज वाढले होते. याच लोकलमध्ये दोन जण शांतपणे बसले होते...अगदी समोरासमोर. 

ओम. इंजिनियरिंग पूर्ण झालेल, मात्र  मनानं खूप introvert. शांत आणि एकाकीपणा पसंत असलेला. तर इशिता...गोरी, सुंदर आणि प्रेमळ स्वभावाची... ती डिजाईन स्टुडिओमध्ये इंटर्न. कानात AirPods आणि हातात फाईल्स घेऊन बसली होती. ती नेहमी कलेच्या विश्वात रमलेली, पण मनात सतत कशाची ना कशाची चिंता.

विरार लोकलचा चर्चगेट प्रवास सुरू झाला...एक एक स्टेशन मागे जात होतं. काही प्रवासी इच्छीत स्टेशनवर उतरत होते तर काही जण लोकलमध्ये चढत होते. लोकलचा वेग वाढला होता, मात्र अचानक मोटरमननं ब्रेक मारला. प्रवाशांना झटका बसला. त्याच वेळी इशिताच्या हातातील स्केच बूक खाली पडलं. समोरच बसलेल्या ओमने ते उचललं आणि इशिताकडे दिलं. ओम काही सेकंद तिच्याकडे पाहात राहिला.  

इशिताने स्माईल दिलं आणि नजरेनेच थँक्स म्हणाली. ओम काहीच बोलत नाही. त्या क्षणी दोघांनी काही म्हटलं नाही, पण लोकलच्या आवाजात नजरेचा एक शांत संवाद झाला.

आता हे रोजचं झालं होतं. इशिताचं ऑफिस चर्चगेटला होतं. ती लोकलच्या प्रवासात स्केच काढत असे. तर ओम पुस्तक किंवा लॅपटॉपमध्ये मग्न असे. असं असलं तरी मध्येच कधी तरी त्यांचे डोळे बोलत असत. ओम आणि इशितामध्ये एक मूक आणि delicate नातं तयार झालं होतं. 

एका दिवशी इशिता आली नाही. दुसऱ्या दिवशीही नाही. आता आठवडा झाला...इशिता लोकलमध्ये आली नाही. ओमला तिची चिंता वाटू लागली. तोही तिची वाट पाहत बसलेला असे. त्याच सीटवर...

“काही झालं  असेल का? मोकळेपणाने बोलली असती तर कळलं असतं… पण आपल्यात काही नातं नसताना मी किती विचार करावा?” असं ओमला वाटू लागलं. 

मात्र 8 दिवसांनी इशिता लोकलमध्ये आली. तीही वांद्रे स्टेशनवर. थकलेली. भागलेली. तिला पाहताच ओमने विचारलं. 

“तू… ठीक आहेस ना? 8 दिवस झाले… दिसली नाहीस.”

इशिता म्हणाली, “तब्येत बरी नव्हती आणि आज इंटरव्ह्यू होता. टेन्शनमुळे खूप पॅनिक झाली होती .”

ओमची चिंता वाढली...त्याने पुन्हा इशिताकडे पाहिलं आणि म्हणाला 

'मला काही कळलंच नाही'

इशिता आणि ओममधला हा पहिला emotional connect होता.

लोकलला उशीर झाल्यामुळे गर्दी वाढली होती. जो तो अंधर चलो, धक्का मारो असं बोंबलत होता. धकाबुक्की सुरू झाली. एवढ्यात मागून कुणी तरी जोरदार धक्का मारला आणि इशिताचा तोल गेला. इशिता पडणार इतक्यात ओम तिला दोन हातांनी पकडतो.  

इशिता ओमकडे पाहते. तिला थोडी असुरक्षितता वाटली, मात्र ती ओमला थँकू म्हणाली. पहिल्यांदा तिने त्याचं नाव घेतलं. ओमलाही जरा बरं वाटलं. 

ओम आणि इशिता आता जवळ येऊ लागले होते. काही दिवसांमध्ये  ते लोकलबाहेरही एकमेकांना भेटायला लागले. मरिन ड्राइव्हच्या कट्ट्यावर ते बसले होते. दोघांनीही इतरांचं भान नव्हतं. मात्रांचा लाटांचा आवाज गुंज घालत होता. इतक्यात इशिता बोलली, 

'लोकल नसती तर आपण भेटलो असतो का?'


'नाही.' ओम हलकं हसत म्हणाला. 

'पण काही भेटी intentional नसतात… त्या universe arrange करतं.'

इशिताने स्माईल केली.  तिच्या डोळ्यांमधले भाव बदलले. ती ओमकडे शांत पण एकटक पाहू लागली. संध्याकाळची रात्र कधी झाली ते कळलंच नाही. दोघेही घराकडे निघाले. नेहमीचाच लोकलचा डबा पकडायचा हे  दोघांनी ठरवलं. चर्चगेट स्थानकात लोकल लागली होतीच. काहीच सेंकदांमध्ये लोकल चर्चगेट स्थानक सोडणार होती. ओम आणि इशिता यांनी चालण्याचा वेग वाढवला. नेहमीच्या डब्याजवळ आली आणि नेमकी लोकल सुटली. इतर काही प्रवासी लोकल पकडायला धावत होते. इतक्यात एका प्रवाशाचा धक्का इशिताला लागला. इशिताचा तोल गेला. काही क्षणात ती लोकलच्या दोन डब्यांच्या गॅपमध्ये येणार..इतक्यात ती जोरात ओरडली...

'ओम...वाचव' 

इशिताच्या ओरडली तसं ओमने झटक मागे वळून पाहिलं. क्षणाचाही विलंब न लावता ओमने इशिताचा हात पकडला आणि तिला खेचलं. ही घटना इतक्या वेगात झाली की ओम प्लॅटफॉर्मवर पडला आणि इशिता त्याच्यावर...लोकलने वेग पकडला...प्रवाशांनी वाचली म्हणत सुस्कारा सोडला...मात्र इशिता ओमकडे पाहात राहिली...ओमने सावरलं..दोघंही उभी राहिली...माझं काय झालं असतं या विचारातून इशिता अद्याप बाहेर आली नव्हती. तिने ओमला बिलगूनच उभी होती. 

'मी आहे… बस. काही नाही होणार.' ओम बोलला.

इशिताच्या हृदयाची वाढलेली धडधड आता कमी झाली होती. इशिता ओमच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत उभी होती.

हाच क्षण दोघांसाठी टर्निंग पॉईंट ठरला. 

“ओम… तू आला नसतास तर… मी—”

ओम तिचा हात धरतो.

“बस. काही बोलू नकोस. तू सेफ आहेस… ते महत्वाचं.”

ती त्याच्या हातात हात गुंफते. शांत, उबदार, जिव्हाळ्याचा क्षण.

त्या दिवसांनंतर इशिता ओमशिवाय लोकल पकडत नाही.

ते एकत्र बसतात, एकत्र हसतात, एकत्र कामाला जातात आणि नंतर एकत्रच चहा घेतात.

गर्दीतली शांतता, धक्काबुक्कीतील जवळीक, वेळेतील लय,

झोपाळकी वारा,आणि त्यांच्या प्रेमाचा नाद वेगळंच सांगून जात होता...लोकलमधलं प्रेम  हे फक्त प्रेम नव्हतं…

हे दोन एकाकी, शांत, प्रेमीयुगुलाचं  healing होतं.




No comments:

Post a Comment